

" वडकी : उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईट सुरू होण्यापूर्वीच चोरी ; हलगर्जीपणाचा कळस ! "
वडकी, प्रतिनिधी :-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडकी येथील उड्डाणपुलावर नुकतेच बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट सुरूही झाले नव्हते, तोच अज्ञात चोरट्यांनी खांबांवरून लाईट काढून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, लाखो रुपयांचा खर्च करून उड्डाणपुलावर प्रकाश व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे ही लाईट व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच चोरट्यांच्या हाती लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी पुरेशी देखरेख नसल्याने चोरट्यांनी सहजपणे खांबांवर चढून लाईट काढून नेल्या. एवढे मोठे साहित्य चोरीला जात असताना कोणालाही याची माहिती न मिळणे हेच आश्चर्यकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे महामार्ग प्रशासन, देखभाल कंत्राटदार आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरी झालेल्या लाईटची किंमत किती? याची जबाबदारी कोण घेणार? तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.
"लाईट सुरू होण्यापूर्वीच चोरीला जाणे म्हणजे विकासकामांवरील देखरेखीचा अभाव आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कंत्राटदार आणि पेट्रोलिंग च्या तीन शिफ्ट कार्यरत असतांना ही चोरी झालीच कशी अशी विचारणा संतप्त ग्रामवासीयांकडून होत आहे.

AI च्या या क्रांतीमध्ये सहभागी होऊया! आजच MS-CIT कोर्स करा.
ज्या लाड्क्याबहिणीनी अद्याप eKYC केली नाही त्यांनी या व्हिडीओ बघून प्रक्रिया करून घ्यावी .
We believe that a business with a great media team can make an impact on the world. Take the first step: contact us, and together, we will help you get your message to the world.
Today | Closed |
Get 10% off your first purchase when you sign up for our newsletter!
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.